दारू पिऊन धिंगाणा घातला, वादग्रस्त पीएसआय विजय गोमलाडू बडतर्फ

933

तेलंगणा राज्यामध्ये दारू पिऊन ढिंगाणा घालणे पीएसआय विजय गोमलाडू यांना चांगलेच भोवले आहे. राजुरा पोलिस ठाण्यातील या वादग्रस्त पीएसआयची पोलीस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पीएसआय विजय गोमलाडू यांनी तेलंगणा राज्यामध्ये दारू पिऊन ढिंगाणा घातला आणि हवेत पिस्तूल भिरकवले होते. परराज्यात जाऊन पोलीस खात्याची प्रतिमा धुळीस मिळविल्याने पीएसआय विजय गोमलाडू यांना विशेष पोलीस महानिरीक्षकानी पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. यासह त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सचिन भोयर यांना निलंबीत करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या