विक्रम गोखले यांच्या हस्ते ‘अंतरंगी वल्ली’चे प्रकाशन

31

संजीव कोलते यांच्या कथांमधील अस्सल, मजेदार वऱ्हाडी पात्रांमुळे या कथा खुशखुशीत, चटकदार तरीही वाचकाला भावूक करणाऱ्या होतात. शिवाय त्यातून दिसणारा वऱ्हाडी ठसका अप्रतिम… अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते किक्रम गोखले यांनी आपले मत व्यक्त केले. निमित्त होते संजीव कोलते यांच्या ‘अंतरंगी वल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी ठाण्यात किक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

‘अभिनंदन प्रकाशन’ संस्थेने ‘अतरंगी वल्ली’ हा कथासंग्रह प्रकाशित केला असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते विघ्नेश जोशी यांनी केले. गोखले यांनी यावेळी कोलते यांच्याबरोबरील आठवणींना उजाळा दिला, तर गोखलेंच्या हस्ते आपल्या कथासंग्रहाचं प्रकाशन झाल्यामुळे आपल्या कथासंग्रहाला एक वेगळंच महत्व प्राप्त झाल्याची भावना कोलते यांनी व्यक्त केली. यावेळी परिषा सरनाईक, प्रमोद कपूर, निरंजन पाठक, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे, सुवर्णा संजीव कोलते, केदार मुळ्ये, गायत्री कोलते-मुळ्ये यांच्यासह मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील कलाकार उपेन्द्र दाते, शुभांगी गोखले, प्रफुल्ल सामंत, उदय साळवी, प्राजक्ता दिघे, सागर तळाशीलकर, जर्नादन लवंगारे, योगिनी पोफळे हेही उपस्थित होते. विक्रम गोखले आणि लेखिका मंजुश्री गोखले यांनी या कथासंग्रहाला प्रस्तावना दिली आहे. मूळचे नागपूरचे असलेल्या संजीव कोलते यांनी रंगकर्मी म्हणून मुंबईत पाय ठेवला. नागपूर निवासातील आपल्या आयुष्यात आलेल्या वल्लींचं व्यक्तिचित्रण त्यांनी या पुस्तकात केलंय.

आपली प्रतिक्रिया द्या