पुलवामा हल्ल्याला वर्ष उलटले, मात्र शहिदाच्या कुटुंबीयांना नोकरी नाही

481
pulwama26

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद रोहिताश लांबा यांचे छोटे भाऊ जितेंद्र लांबा यांनी आरोप केला आहे की, त्यांना एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे अशा चक्करा माराव्या लागत आहेत. माझा भाऊ शहीद झाल्यानंतर मला नोकरी देण्याचे आश्वासन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून देखील मला नोकरी मिळालेली नाही अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली.

27 वर्षाच्या शहीद रोहिताश लांबा यांच्या धाडसाची चर्चा आजही गावात सर्वजण करतात. जयपूरच्या शाहपुरा येथील रोहितांश हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले होते. मात्र सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना दिलेली सर्व आश्वासनं अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही असे वृत्त आजतक या हिंदीवृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

शहीद रोहितांश यांचे वडील बाबूलाल लांबा म्हणाले की पुलवामा प्रकरणातील दोषी कोण हे अद्याप आपल्याला कळालेले नाही. त्यांना शिक्षा झाली आहे का ते देखील कळालेले नाही. बाबूलाल लांबा यांना आतापर्यंत दीड कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या बाजूला शहीद रोहितांश यांचे भाऊ जितेंद्र लांबा यांनी आश्वासन देऊन देखील सरकारकडून आपल्याला अद्याप नोकरी मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे मला फिरावे लागले. मात्र नोकरी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी मला दोन वेळा बोलवण्यात आले, खासदारकीसाठी तिकीट देऊ असे म्हणाले. पण मला तिकीट नको नोकरी द्या असे आपण त्यांना स्पष्ट सांगितल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.

पुलवामा हल्ल्यात रोहितांश शहीद झाले तेव्हा त्यांचा मुलगा अवघ्या दोन महिन्यांचा होता. मोठं दु:ख रोहितांश यांच्या पत्नीने सहन केलं. मात्र आपला मुलगा मोठा होऊन लष्करातच भरती व्हावा अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या