पुणे – आतापर्यंत पोलीस दलातील 561 जणांना कोरोना, 250 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ड्युटीला दिले प्राधान्य

401
pune-police

शहर पोलीस दलातील तब्बल 561 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 426 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर 50 टक्क्यापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत.

लॉकडाउनमध्ये रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या सर्वाधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेषतः कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात नियंत्रणासाठी रात्रंदिवस काम करताना पोलिसांकडून काळजी घेतली जात होती. मात्र, काही बेशिस्त नागरिकांशी संपर्क आल्यामुळे पोलिसांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्याठिकाणी आणखी काही पॉझिटीव्ह कर्मचारी सापडल्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन केले होते.

‘आम्हाला तुमचा अभिमान’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

लॉकडाउनसह बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या 561 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 426 जण ठणठणीत बरे झाले आहे. त्यापैकी 250 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ड्युटीला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, प्रशासनाने पोलिसांसह  कुटुंबिसाठी स्वतंत्र हॉस्पिटल राखीव ठेवले आहे. त्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून एका सहायक आयुक्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता शहरातील विविध रुग्णालयात 132 पोलीस कोरोनाचे उपचार घेत आहेत. त्याशिवाय 45 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिस दलाकडून घेतली जाणारी काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी देण्यात आलेली औषधाचा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या