पुणे- चॉकलेटचं आमीष दाखवत वृद्धाने केला 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

चॉकलेट देण्याच्या आमिषाने वृद्धाने त्याच्या नातीच्या वयाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपीचे वय 65 वर्षे असून त्याचे नाव हुसेन सुलतान धोटेकर (वय 65 वर्षे) आहे. धोटेकरला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मार्चला संध्याकाळी चारच्या सुमारास आरोपी हुसेनने अल्पवयीन मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने घरी नेले. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देउन लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या