पुणे येथील झोपडपट्टीमध्ये भीषण आग

40

सामना ऑनलाईन । पुणे

पुणे येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे प्रमाण अधिक असल्यामुळे तब्बल अग्निशमन दलाच्या ६० ते ७० जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी तीन सरकारी तर ८-१० खासगी वॉटर टँकर रवाना झाले आहेत.

तीन ते चार गँस सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तूर्तास घटनास्थळी चार रुग्णवाहिकाही दाखल झाल्या असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीच्या धुरामुळे एका जवानाला त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या