जो (भाऊ) बायडन आणि कमला (अक्का) हॅरिस यांचे हार्दिक अभिनंदन! पुण्यात पोस्टरबाजी

नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या जो बायडन आणि उपराष्ट्राध्यपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. बायडन आमि कमला हॅरिस यांनी शपथ घेताच अमेरिकेत जल्लोष झालाच, शिवाय पुणेकरांमध्येही उत्साह संचारला. जो बायडन आणि कमला हॅरिस यांना मराठीमध्ये शुभेच्छा देणारे भन्नाट पोस्टर पुण्यातील रस्त्यावर झळकले.

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ‘घासून नाय, तर ठासून आलोय’ असे लिहित पोपटराव खोपडे या पुणेकराने जो बायडन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या.

‘जो (भाऊ) बायडेन’ यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आणि हिंदुस्थानी वंशाच्या ‘कमला (अक्का) हॅरिस’ यांची उपराष्ट्राध्यक्षपदी तसेच हिंदुस्थानी वंशाच्या 14 मंत्र्यांची अमेरिकेमध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’, अशा गावरान मराठी भाषेत बायडन आणि हॅरिस यांना शुभेच्छा देण्यात आल्या

pune-poster

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या. वाशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे आयोजित या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या