सख्ख्या मावशीकडून पुतणीशी अश्लिल वर्तन; कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1189
crime

सख्ख्या मावशीनेच अल्पवयीन पुतणीसमोर अश्लिल कृत्य करून वाईट धंद्याला लावण्याचा धक्कादायक प्रयत्न कोंढवा परिसरात घडला आहे. याबाबत भवानी पेठेतील मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार मावशी व तिच्या प्रियकराच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने दोन मुली आणि एक मुलगा तिच्या बहिनीकडे कोंढव्यात पाठविले होते. लॉकडाउनमध्ये ही सर्व मुले त्याठिकाणी राहिली. त्यानंतर घरी आल्यानंतर मोठी मुलगी घाबरल्यासारखी राहत होती. तिच्याकडे विचारणा केल्यानंतर मावशी केलेल्या प्रकार समोर आला. तक्रारदार यांची बहीन तिच्या प्रियकरासोबत राहत होती. तिने मोठ्या मुलीला वेश्या व्यवसाय केल्यानंतर मोठे पैसे मिळतील, असे सांगितले. तिचा प्रियकर एकत्र असताना मुलीला खोलीत बोलावून तिच्याशी अश्लिल बोलून तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीने आरडा-ओरडा केल्यानंतर तिला सोडले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या बहिन भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या