मनसे, भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुणे– मनसेच्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना जाधव, मनसे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेना उपाध्यक्ष सुनील जाधव, भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, दीपक हेगडे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक सचिन तावरे, शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र चिटणीस कीर्तिताई फाटक, राधिकाताई हरिश्‍चंद्रे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे, शहर समन्वयक शिरीष आपटे, विभागप्रमुख श्रीकांत पुजारी, राजेंद्र शिळीमकर, शशिकांत पापळ आदी यावेळी उपस्थित होते, असे शहर समन्वयक प्रसिद्धी शिरीष आपटे यांनी सांगितले.