काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. धक्कादायक म्हणजे या महिलेचे शीर धडावेगळे केले होते. तसेच हात आणि पायही कापले होते. या महिलेची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून या हत्येमागचे कारण ऐकून पोलिसही थक्क झाले.
सकीना अब्दुल खान असे मृत महिलेचे नाव असून त्या 48 वर्षांच्या होत्या. सकीना आपला भाऊ अश्पाक खान आणि वहिनी हमीदा खान यांच्यासोबत राहत होत्या खान कुटुंबाचे पुण्यात घर होते. पण तिघांमध्ये सतत वाद होत होते. पुण्यात खान कुटुंबीयांचे जे घर होते ते त्यांच्या आईच्या मालकीचे होते. आई गेल्यानंतर त्यांनी हे घर सकीना यांच्या नावे केले होते. पण या घराच्या मालकीवरून भाऊ आणि बहिणीमध्ये सतत वाद होत होते.
23 ऑगस्टला त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. तेव्हा अश्पाक आणि त्यांची पत्नी हमीदा यांनी गळा आवळून सकीना यांचा खुन केला. त्या रात्री खुप पाऊस होता म्हणून शेजारच्यांना कळालेही नाही. मग अश्पाक यांनी हमीदा यांच्या शरीराचे तुकडे केले. शीर धडावेगळे केले, हात तोडले आणि पायसुद्धा तोडले. त्यानंतर अश्पाक यांनी हमीदा यांच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
सकीना यांच्या भाचीने आपली मावशी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. तसेच घरावरून मामा आणि मावशीमध्ये वाद होते असेही भाचीने सांगितले. पोलिसांनी नदीपात्राजवळील सीसीटीव्ही तपासले. बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारी तपासल्या. त्यावरून सकीना यांचा शोध घेतला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अश्पाक आणि हमीदा यांना अटक केली आहे.