सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या मोटारीमधून 8 लाखांची रोकड लंपास

565
crime

महर्षीनगर येथील एका सोसायटी मध्ये पार्क असलेल्या मोटारीमधून चोरट्याने 8 लाखांची रोकड चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीयोतोष पायगुडे (वय 37, रा. अंकुरपार्क सोसायटी, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्राह्मनंद नाईकवडी यांनी सांगितले, फिर्यादी हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांच्याकडे कामगारांचे पैसे देण्यासाठी 8 लाखाची रोकड होती. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्या कारमध्ये रोकड ठेवली होती. तशीच कार त्यांनी त्यांच्या इमारतीच्या पार्कींगमध्ये पार्क करून ठेवली असताना कार मधील कारटेप चोरी करताना त्यांच्या हाताला ही आठ लाखांची रोकड लागली. चोरट्यानी कारची काच फोडून ही रोकड चोरी केली. हा प्रकार रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पायगुडे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या