कोरोनामुळे पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

कोरोना संसर्गामुळे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर पोहचली आहे. जनार्धन रामचंद्र चिखले (वय 57) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस फौजदार जनार्धन चिखले मागील पाच वर्षांपासून हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 18 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस दलात कोरोनाचा हैदोस सुरुच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या