पत्नीसह तिच्या मित्राच्या जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

पत्नीसह तिच्या मित्राच्या जाचाला कंटाळून तरूणाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना ऑगस्ट 2022 मध्ये नर्‍हेत घडली आहे. याप्रकरणी कुटूंबियाने उशीरा तक्रार दिल्यानंतर तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरूद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र चंद्रकांत किंद्रे (वय 35 रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नर्‍हे)  असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत किंद्रे (वय 80 रा. नांदगाव भोर) यांनी फिर्याद दिली आहे.  रवींद्र आणि आरोपी महिलेचे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिची एका तरूणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर तिने मित्रासोबत संबंध टिकविण्यासाठी रवींद्रसोबत सातत्याने वाद घातला. त्याला मारहाण करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून रवींद्रने 17 ऑगस्टला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.