रात्रीच्या वेळी मोबाईल, वाहनचोरी करणारा गजाआड; येरवडा पोलिसांकडून 5 मोबाईल, 2 दुचाकी जप्त

शहर परिसरात रात्रीच्या वेळी वाहनचोरी तसेच पादचारी नागरिकांकडील मोबाईल हिसकावणार्‍या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 5 मोबाईल, 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

उमेश प्रेम सहाणी (18, रा. नागपूर चाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहाणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. येरवडा पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान अंमलदार किरण घुटे, सुरज ओंबासे यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे येरवडा भागात जबरदस्तीने मोबाईल चोरणारा संशयित आरोपी साहणी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या 2 दुचाकी आणि 5 मोबाईल असा1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अंमलदार तुषार खराडे, दत्ता शिंदे, अमजद शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.