पुणे- लाच मागितल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

428

जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मगितल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन घोडे पाटील (वय 38) आणि कर्मचारी धर्मात्मा कारभारी हांडे (वय  37) असे लाच घेणाऱ्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, अर्जुन घोडे पाटील हे पुणे ग्रामीण पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांना नारायण गाव पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला होता. तर हांडे हे येथे कर्व्यव करत होते. दरम्यान तक्रारदार यांचे विरोधात नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून नमूद गुन्हयात इतर दोन आरोपीने अटक न करण्यासाठी हांडे यांनी सहायक निरीक्षक घोडे पाटील यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची स्पष्ट लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या