एटीएममधून रक्कम काढण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक

एटीएम मशीनमधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने ज्येष्ठाकडील कार्डची अदलाबदली करून 30 हजारांची फसवणूक केली. ही घटना 6 डिसेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास हडपसरमधील गंगा अपार्टमेंटमध्ये असलेल्या एटीएममध्ये घडली.

फिर्यादी ज्येष्ठ नागरिक 6 डिसेंबरला हडपसरमधील गंगा अपार्टमेंटमध्ये असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करीत एटीएम कार्ड ताब्यात घेत पीनकोड विचारून घेतला. त्यानंतर हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून चोरट्याने दुसरेच कार्ड ज्येष्ठाला दिले. काही वेळानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून 30 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस अमलदार आर. ए. मद्देल तपास करीत आहेत.