सराईताच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी एकाला अटक, तीन गुन्ह्यात होता फरार

सराईत गुंडाच्या अंत्यविधीची रॅली काढून दहशत पसरविल्याच्या प्रकरणासह अन्य दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केले. सिध्दार्थ संजय पलंगे (वय – 21, रा. गुलमोहर सोसायटी, बालाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बिबवेवाडीत वादातून सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर कात्रज स्मशानभूमी येथे अंत्यसंसस्कार करण्यात आला. त्यावेळी 100 ते 125 जणांनी दुचाकी रॅली काढली होती. त्यामध्ये सिध्दार्थ पलंगे याचा सहभाग होता. तेव्हापासून पलंगे फरार होता.

दरम्यान, पलंगे खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या सुचनेनुसार पथकाने पलंगे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरूद्ध सहकारनगर, दत्तवाडी, बंडगार्डन पोलिस ठाण्या अंतर्गत जबर दुखापत, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या