पुणे – व्यावसायिक स्पर्धेतून झालेल्या हल्ल्यात हॉटेल मालकाचा मृत्यू

व्यवसायातील स्पर्धेतून हल्लेखोराने तलवारीने वार करून गंभीर जखमी केलेल्या उरुळी कांचन (ता.हवेला) गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे (वय 41 ) यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि. 20) पहाटे अडीच वाजणेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

रामदास आखाडे रविवारी (दि. 18) रात्री पावणे नऊ च्या सुमारास हॉटेल गारवा परिसरात बसले होते. त्यावेळी दोघा हल्लेखोरांपैकी एकाने हॉटेलमध्ये प्रवेश करुन त्यांच्यावर तलवारीने जिवघेणा हल्ला केला होता. डोक्यात गंभीररीत्या खोलवर वार झाल्याने त्यांची मृत्यूची झुंज सुरू होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागिल मुख्य आरोपी फरारी आहे. व्यवसायातील स्पर्धेतून हा हल्ला घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या