दागिन्यांची ऑर्डर पोहचविण्याआधीच कारागीर फरार, 17 लाखांच्या दागिन्यांचा अपहार

crime

कारागिराकडे बाहेरगावातील दागिन्यांची ऑर्डर पोहचविण्याची जबाबदारी मालकाला महागात पडली आहे. संबंधित कामगाराने रोकउ, दुचाकी आणि सोन्याचे दागिने मिळून 17 लाख 24 हजारांचा ऐवज धेउन फरार झाला आहे. ही धटना 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान रविवार पेठ ते खरडा नगर प्रवासामध्ये घडली आहे. याप्रकरणी कायेम शेख (वय 46, रा. नाना पेठ ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, कायेम शेख यांचे रविवार पेठेत गोल्ड स्मिथ नावाचे दुकान आहे. त्या दुकानात एक कारागिर कामाला होता. मागील काही वर्षांपासून तो कारागिर दुकानात कामाला असल्यामुळे 19 नोव्हेंबरला कायेम यांनी त्याच्याकडे बाहेरगावातील सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर पोहोच करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, त्याने दागिन्यांची ऑर्डर न पोहोचविता कायेम यांना 17 लाख 24 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या