वाढदिवसाची पार्टी पाहणं पडलं महागात, मजुराला बेदम मारहाण

वाढदिवसाची पार्टी पाहत थांबलेल्या मजुरला चोर समजून टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना 25 सप्टेंबरला धायरी परिसरात घडली. गणपतसिंह मेरावी (38) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सुकलसिंह मसराम 25, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सुकलसिंह आणि गणपतसिंह धायरीतील लेबर कॅम्पमध्ये राहायला आहेत. 25 सप्टेंबरला परिसरात एकाने मित्रांना वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी गणपतसिंह पार्टीत नाचत असलेले लोक पाहत थांबला होता. त्यावेळी जमलेल्या इतरांना गणपतसिंह चोर असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे तपास करीत आहेत.