पत्नीचे नाव अन मैत्रिणीसोबत भटकंतीचा डाव महागात, पोलिसांनी थेट बायकोलाच बोलावून घेत केला भांडाफोड

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत पत्नीचे कारण सांगून मैत्रिणीसोबत मोटारीतून फिरणाऱ्या तरूणाचे पोलिसांनी नाकाबंदीत बिंग फोडले आहे. पत्नीला आणायला चाललो असल्याचे कारण बंडगार्डन पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांना रूचले नाही. त्यांनी तरूणाच्या पत्नीला फोन लावून खात्री केल्यानंतर भलताच प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर तरूणाची पत्नी घरातून धावत-पळतच चौकात पोहोचली. तिचा नवरा आणि त्याची मैत्रिणी सोबत पाहून पारा चढला. त्यानंतर तिने सर्वासमक्ष नवीऱ्याचा चांगलाच पाणउतारा केला.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा चांगलाच बडगा उगारला आहे. नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांकडे विचारपूस करण्यात येत आहे. कामाशिवाय घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक वसुली केली जात आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही सातत्याने काही पुणेकर संचारबंदीच्या काळात काहीही कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यानुसार नाकाबंदीत अशीच एक घटना गुरूवारी (दि. 27) बालगंधर्व चौकात उघडकीस आली आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून विनाकारण भटकंती करणाऱ्याविरूद्ध पोलीस बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकात कारवाई करत होते. त्यावेळी एक जोडपे मोटारीतून चौकातून जाताना पोलिसांनी त्यांना अडविले.

गाडीमध्ये एक जोडपे दिसुन आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तरूणाने बायकोला आणायला जायचे आहे, असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मोटारीतील तरूणी कोण असे विचारल्यानतंर, त्याने माझ्या पत्नीची मैत्रिण असल्याचे सांगितले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी त्याला दंड भरायला सांगितला. मात्र, त्याने दंड भरायला पैसे नसल्याचे सांगितले. सुमारे पाऊणतास संबंधित जोडपे बालगंधर्व चौकात थांबुन होते. त्यानंतर पोलिसांनी तरूणाच्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले. काही वेळानंतर तरूणाची पत्नी घटनास्थळी आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे दंड जमा केला. मात्र, पतीला मैत्रिणाला सोबत बघितल्यानतंर तिचा राग अनावर झाला. तिने सर्वासमक्ष पतीचे भांडाफोड करीत पाणउतारा केला. त्यामुळे नागरिकांनो तुम्ही जर विनाकारण आणि खोटी कारणे देउन भटवंâती करीत असल्यास खबरदारी घ्या. अन्यथा पुणे पोलिस तुमचा पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या