जहला – मारणे टोळीतील फरार आरोपींना अटक

बोपदेव घाटात तरूणाला मारहाण करीत लुटमार करत दोन वर्षांपासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या एक पथकाने अटक केले. अभिषेक ऊर्फ नन्या मारणे (रा.माळेगाव ता. मुळशी) आणि अक्षय अशोक सावले (वय 23, रा. खामबोली, मुळशी) अशी अटक केलेल्याचे नावे आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी महंमद वसीम महंमद सलीम कुरेशी (रा. कॅम्प) यांची लुटमार केली होती.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तरूणाला लुटन दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपींची माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनावणे यांना मिळाली. घोटावडे फाटा परिसरातून आरोपी पळून जाणार येणार नाही, असा सापळा रचत पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी ‘काय अभिषेक’ असा आवाज दिला. त्यावेळी त्याने मागे वळून पाहिले. आरोपीला संशय आल्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याचा साथीदार अक्षय यालाही ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन त्याला कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सुशिल जाधव, दत्ता सोनावणे, विजयसिंह वसावे, अशोक माने, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, मिना पिंजण यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या