पुणे – चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

1175

चित्रपटात अभिनयाचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने व्हिडीओ कॉलकरून एकाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना उंड्री परिसरात घडली असून तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल श्रीवास्तव (रा. केरळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची एका व्यक्तीमार्फत राहूलची ओळख झाली होती. त्यावेळी राहूलने महिलेला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर स्क्रीन टेस्टसाठी त्याने महिलेला  व्हिडीओ कॉल केला. फोनवर बोलत असताना राहूलने महिलेचे स्क्रीन शॉट काढून अश्लिल फोटो तयार केले. त्यानंतर संबंधित फोटो मॉडेलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले. त्यानंतर त्याने महिलेला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करीत फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची भिती दाखविली. त्याशिवाय शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

आपली प्रतिक्रिया द्या