जादा नफा देण्याच्या आमिषाने 29 लाखांची फसवणूक

कंपनीत गुंतवणूकीवर जादा नफा देण्याच्या आमिषाने चौघाजणांनी तरूणाची 29 लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना एप्रिल ते ऑगस्ट 2022 कालावधीत भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे.

कुंडलीक सोनटक्के (वय 44, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मित्राच्या मध्यस्थीतून कुंडलीक यांची आरोपींसोबत ओळख झाली होती. त्यांनी अ‍ॅमविन ग्लोबल एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीत गुंतवूणक केल्यास जादा नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे कुंडलिक यांनी वेळोवेळी संबंधितांच्या कंपनीत 29 लाखांची रक्कम जमा केली. मात्र, नफा न मिळाल्यामुळे त्यांनी विचारपूस केली असता, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.