खंडणीप्रकरणी छोट्या राजनच्या पुतणीला बेड्या, खंडणी विरोधी दोन पथकाकडून कारवाई

crime

छोटा राजन गॅगस्टरची मी सख्खी पुतणी असून त्यांचा माझा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर 50 लाख रूपये दे, अशी तरूणाला धमकी देउन फरार असलेल्या महिलेला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केले आहे. प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, रा. जांभुळकर चौक, वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुख्यात गॅगस्टर छोटा राजन याची ती पुतणी आहे.

तरूणाविरोधात पत्नी आणि मेव्हणीने तक्रार केली होती. त्यामध्ये हस्तक्षेप करीत निकाळजे टोळीने संबंधित तरूणाला 50 लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 25 लाखांची खंडणी स्वीrकारताना पोलिसांनी यापुर्वी दोघांना अटक केली आहे. धीरज साबळे आणि मंदार वाईकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मात्र, मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे फरार होती. याप्रकरणी खंडणी विरोधी दोन पथकाकडून तिचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी प्रियदर्शनी निकाळजे वानवडी परिसरात असल्याची माहिती पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने सापळा रचून अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सचिन अहिवळे, प्रदीप शितोळे, शैलेस सुर्वे, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, संपत अवचरे, भूषण शेलार, मोहन येलपले, राहूल उत्तरकर, अमोल पिलाणे, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

”खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधित मुख्य आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना अशाप्रकारे दमदाटी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचे कठोर धोरण स्वीकारले आहे.” – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

आपली प्रतिक्रिया द्या