पुणे – सेवानिवृत्त पोलिसावर वार करुन लुटणारे दोघे अटकेत

502

रस्त्याने पायी चाललेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकाविणाऱ्या सराईतासह दोघांना खडक पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून दुचाकी आणि मोबाईल मिळून 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अश्पाक महमंद शेख (वय 29, रा. अशोकनगर, येरवडा) आणि सुशील मुकुंद निकम (वय 26, रा. गणेशनगर, येरवडा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकाश जयकुमार बुरले (वय 58, रा. स्वारगेट पोलीस लाईन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे सेवानिवृत्त फौजदार असून 25 ऑगस्टला ते शिवाजी रस्त्यावरुन घरी चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी प्रकाश यांच्यावर कोयत्याने वार करुन मोबाईल हिसकावून नेला होता. हल्ल्यातील सराईत आरोपी अश्पाक शेख असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर माळवदकर आणि बंटी कांबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अश्पाक आणि सुशीलला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या