पुणे – शितळादेवी मंदिरात चोरी करणाऱ्या तडीपाराला पकडले

शहरातील नाना पेठेत असलेल्या श्री शितळादेवी मंदीरातून चांदीचा मुकूट चोरणाऱ्या तडीपाराला समर्थ पोलिसांनी अटक केले. विनायक बंडू कराळे (वय – 22, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नाना पेठेतील नवा वाडा परिसरात असलेल्या श्री शितळादेवी मंदिरातून चांदीचा मुकूट चोरीला गेला होता. त्यानुसार समर्थ पोलीस घटनेचा तपास करीत होते. त्यावेळी सराईत तडीपार रास्ता पेठेत असल्याची माहिती कर्मचारी हेमंत पेरणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने श्री शितळादेवी मंदिरातील चांदीचा मुकूट चोरटल्याची कबुली दिली. त्याच्याविरूद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी असे 8 गुन्हे दाखल आहेत. कराळेला पोलिसांनी शहरातून तडीपार केले होते.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, शाम सूर्यवंशी, सचिन पवार, सुमीत खुट्टे, निलेश साबळे, सुभाष मोरे, विठ्ठल चोरमले यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या