धक्कादायक; तंबाखू न दिल्याच्या रागातून मित्राचा केला खून

crime

तंबाखू न दिल्याच्या रागातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटकही केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. सागर बापू शिंदे (वय 29 रा. कुपवाड, जि. सांगली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्ता दिगंबर ठोंबरे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. कर्मचारी देवेंद्र खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि दत्ता एकमेकांचे चांगले मित्र असून ते बिगारी कामगार आहेत. मिळेल ती कामे करून ते उपजीविका चालवीत होते. काल सायंकाळी कामावरुन आल्यानंतर दोघे एकत्र बसले होते. दत्ताने सागरला तंबाखू मागितली. परंतु त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या दत्ताने जवळ पडलेली वीट उचलून सागरच्या डोक्यात मारली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने सागरचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिस निरीक्षक माने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या