विमाननगरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दापाश, 2 तरुणींची सुटका; एकाला अटक

पैशांचे आमिष दाखवून तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकाला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केले. त्याशिवाय दोन तरूणींची सुटका करण्यात आली. लिलाधर हरिप्रसाद भारती उर्फ निखील (वय – 29, रा. वडगाव शेरी, मूळ- आसाम) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार ऋषी फरार झाला आहे.

स्वतःच्या आर्थिंक फायद्यासाठी दोघेजण विमाननगरमधील साकोरेनगरमध्ये तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोन तरूणींची सुटका केली. त्याशिवाय पैशांचे आमिष दाखवून तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लिलाधरला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार ऋषी फरार झाला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या