पुणे – रागातून पत्नीसह मेव्हनी, सासूनला केली मारहाण

पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तरूणाने पत्नीसह मेव्हणी आणि सासूला मारहाण करीत दुचाकीची तोडफोड केल्याची घटना धनकवडीतील केशवनगरमध्ये घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.

आरोपी व फिर्यादी पती-पत्नी असून मागील काही दिवसापुर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्यातूनच आरोपीने पत्नीची दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी करून दगडाने फोडली. त्यानंतर पत्नीला दगडाने मारहाण करीत रस्त्यावरून फरफटत नेले. हा सर्व प्रकार पाहून फिर्यादींची आई व बहीण भांडण सोडवण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांना सुद्धा आरोपीने हाताने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या