महिला पोलीस अमंलदाराचा ड्रेस फाडला, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात तक्रार लिहून घेत असताना मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉडिंग करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या महिलेला विचारणा केल्याचा राग आल्यामुळे तिने महिला पोलीस अमंलदाराच्या ड्रेसची बटणे तोडून धक्काबुक्की केली. ही घटना गुरुवारी रात्री सव्वासातच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी कविता विनयकुमार पटेकर (वय 45, रा. कात्रज ) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यप्रभा सासवडे यांनी फिर्याद दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पुण्यप्रभा सासवडे अमंलदार आहेत. गुरुवारी संध्याकाळी पुण्यप्रभा संबंधित महिलेची तक्रार नोंदवून घेत होत्या. त्यावेळी कविताने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉडिंग करून शासकीय कामकाजात अडथळा आणला. याप्रकरणी विचारणा केल्यामुळे तिने महिला अमंलदार पुण्यप्रभा यांच्या ड्रेसची बटणे तोडली. त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मधुरा कोराने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या