दोन वर्षापूर्वी झालेल्या खूनाची उकल करण्यात येरवडा पोलिसांना यश

प्रातिनिधिक फोटो

दोन वर्षांपूर्वी येरवड्यात झालेल्या खूनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केले आहे. कुणाल जाधव उर्फ राजा आणि राकेश भिसे उर्फ गंदया अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांचा साथीदार निखील यादव उर्फ एन वाय सध्या येरवडा कारागृहात आहे.

येरवड्यातील एका शाळेमागे झुडूपात 25 मे 2019 ला पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे आणि पोलीस नाईक अमजद शेख तपास करीत होते.

दोन दिवसांपूर्वी करपे आणि शेख यांना संबंधित खून तिघांनी मिळून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल आणि राकेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संबंधिताने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे तिघांनी मिळून खून केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, प्रदीप सुर्वे, बाळासाहेब गायकवाड, गणपत थिकोळे, तुषार खराडे, नवनाथ मोहिते, गणेश वाघ, अनिल शिंदे, सुनील नागलोत, समीर भोरडे, रूपेश तोडकर, संजय भरगुडे, अजय पडोळे, राहूल परदेशी, विनायक साळवी यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या