टेरेसवर गेली महिला; तेवढ्या साधला डाव, पुण्यात घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज चोरीला

हडपसरमध्ये एक महिला इमारतीच्या टेरेसवर गेली. तेव्हा घरफोडी करणार्‍या चोरांनी डाव साधत लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबियासह केतकेश्वर इमारतीत राहायला आहे. सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्या घराचा दरवाज्याची कडी न लावता इमारतीच्या टेरेसवर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी नेमकी संधी साधून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर देवघरातून 30 हजारांची रोकड आणि दागिने असा 6 लाख 12 हजारांचा ऐवज चोरी केला. घरात आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या