मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरीच्या मालकासह अकरा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

1795

पुणे जिल्ह्यातल्या मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरीच्या मालकासह अकरा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हडपसर परिसरात भीतीचे वातावरण आहे. मागील चार दिवसापूर्वी डेअरीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने तपासणी करण्यात अली होती. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आल्याने, डेअरीच्या मालकासह 11 जणांना तपासणी केली.

गुरुवारी रात्री उशिरा रिपोर्ट आला आहे. यामध्ये अकरा जणांचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे डेअरी मधून जवळील सोसायटीच्या नागरीकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहेत. अशा नागरिकांना महापालिकेकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू केले आहे. लॉक डाऊनमध्ये डेअरी सुरू होती. या डेअरीवर अनेक ठिकाणचे नागरिक येऊन दूध, लस्सी, समोसे व गोडाचे पदार्थ अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून खरेदी केलेल्या नागरिकांची शोध महापालिका कशा पद्धतीने घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी सांगितले, एका डेअरी मधील मालकासह अकरा कर्मचारी हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहे. त्यामुळे आज सकाळ पासूनच डेअरीच्या परिसरातील सोसायटी नागरीकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे, यामध्ये कोणाला कोरोनाची लक्षणे असतील तर त्यांची तपासणी करून घेणार आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या