ऐकावे ते नवलच… मोटारीच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे वाहन चालकावर गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

अज्ञात वाहनांच्या धडकेत भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी एका वाहन चालकाविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी प्राणीमित्र रितम बनसोडे (वय -23) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रितेश हे प्राणीमित्र असून महर्षीनगर येथे राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी परिसरातील एका मेडिकलसमोर भरधाव मोटार चालकाने कुत्र्याला जोराची धडक दिली. त्यामुळे मार लागल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला. त्यानंतर रितम व इतरांनी कुत्र्याला प्राणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण कुत्र्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

त्यानंतर रितम यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही पडताळणी करण्यात आली आहे. त्यात मात्र स्पष्ट असे काही दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या