स्वेटर घेऊन घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पावसाने गंडवलं

23

सामना ऑनलाईन,पुणे

गेले दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानानंतर सोमवारी दुपारनंतर पुणे शहर, उपनगरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहर आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला होता.

shirur-rain-road

पुण्यात सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. दिवसांतून एक-दोन वेळा सूर्याचे दर्शन झाले. शहराच्या अनेक भागांत सकाळपासून अधूनमधून पावसाचे थेंब पडत होते. सायंकाळच्या सुमारास स्वारगेट, कोथरूड, पुणे स्टेशन, धायरी, हिंजवडी, सिंहगड रस्ता, मध्यभागातील पेठांसह या परिसरासह शहराच्या विविध भागांत हलक्या सरींनी हजेरी लावली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हेवली, पुरंदर इंदापूर, दौंड तालुक्याच्या काही भागांमध्ये सायंकाळनंतर पाऊस पडला. रात्री कात्रज, आंबेगाव, नऱ्हे, वडगाव धायरी कॅम्प कोथरूड, औंध, विद्यापीठ, कल्याणीनगर, वडगाव शेरी परिसरात पावसाने जोर धरला होता. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या