पुणे – फॅमिली डॉक्टरनेच केला तरुणीवर अत्याचार, बिबवेवाडीतील धक्कादायक घटना

1634

फॅमिली डॉक्टरनेच एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडीतील आयुर क्लिनिकमध्ये घडली आहे. पंचकर्म उपचार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला सीसीटीव्हीचे फुटेज व्हायरल करण्याची धमकी देऊन डॉक्टरने अत्याचार केले आहेत. याप्रकरणी डॉ. सूरज वाडियार (रा. कोंढवा बुद्रूक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील शिवरायनगरमध्ये डॉ. सूरज यांचे आयुर क्लिनिक आहे. त्याठिकाणी संबंधित तरुणी पंचकर्म उपचार करुन घेण्यासाठी गेली होती. काही वर्षांपासून डॉ. सूरज हा तरुणीचा फॅमिली डॉक्टर आहे. दरम्यान, पंचकर्मचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करण्याची धमकी देऊन, डॉक्टरने तरुणीवर अत्याचार केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या