पुण्यात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण, नागरिकांमध्ये खळबळ

शहरातील विविध भागातून पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे कुटूंबियांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अपहरणकत्र्यांनी मुलींना वेगवेगळया प्रकारचे आमिष दाखविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपहरण झालेल्या मुलींचे वय 10 ते 17 एवढे आहे.

आंबेगाव खर्द परिसरातील दत्तनगरमध्ये खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या कुटूंबियांनी भीती व्यक्त केली आहे. नऱ्हेतून 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. त्याशिवाय पर्वतीतील जनता वसाहतीत राहणाNया16 वर्षीय मुलीचेही अपहरण करण्यात आले आहे. खडकीतील 17 वर्षीय मुलगी आणि मुंढव्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दोन ते तीन दिवसांत अल्पवयीन मुलासह मुलींच्या अपहरणामुळे खळबळ उडाली आहे.

येवलेवाडीतून मुलाचे अपहरण
येवलेवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबातील 16 वर्षीय मुलाचे घरातून अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या