एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक

1078

कोपरगाव येथील एका इसमाला एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हा इसम गेल्या दोन वर्षापासून कॉलेजला जातांना मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग करत होता. तसेच तिच्या घरासमोर येऊन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करून धिंगाणा करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणाऱ्या इसमाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव येथील कॉलेजमध्ये व्यवसाय शिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध 2018 पासून ते 25 मे 2020 पर्यंत गेल्या दोन वर्षापासून पाठलाग करून सलगी वाढविण्याच्या दृष्टीने फोन करून व मेसेज पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याने नेहमी आमच्या घरासमोर येऊन अश्लील हावभाव करतो. तसेच तू जर फोन घेतला नाही तर दारू पिऊन येऊन तुझ्या घरासमोर धिंगाणा करील, अशी धमकी देऊन आरोपी मयूर राजेंद्र शिरसाठ (21) याने तिचा विनयभंग केला. याबाबत मी माझ्या वडिलांना सांगितले असल्याचे पीडित मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या