हडपसरमध्ये तोतया पत्रकाराला अटक, तरुणाकडे मागितली होती 5 लाखांची खंडणी

पुणे शहरातील हडपसर परिसरात आणखी एका तोतया पत्रकाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधिताने तरूणाला फोन करून त्यांच्या टेम्पोतून सिगारेटची विक्री होत असल्याचा आरोप करीत चालकाला मारहाण केली होती. त्यानंतर टेम्पोची काचही फोडली होती. 16 सप्टेंबरला ही घटना घडली होती. पोलिसांनी अर्जुन लक्ष्मण शिरसाठ (वय – 41, रा. दांडेकर पूल ) नावाच्या तोतया पत्रकाराला अटक केली आहे. याप्रकरणी मंदार ठोसर (वय – 32, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

मंदार यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. गुरुवारी ते घरी असताना आरोपी अर्जुन शिरसाठ याने त्यांना फोन करून आपण पत्रकार असल्याचे सांगितले. तुमच्या टेम्पोतून सिगारेट, बिडी विक्री केली जाते, प्रकरण पोलिसांपर्यत जाऊ द्यायचे नसेल तर मला 5 लाख रूपये द्यावे लागतील, अशी मागणि केली. त्यानंतर आरोपी अर्जुन याने मंदार यांच्या चालकालाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली व डोक्यात काचेची बाटली फोडली. त्याशिवाय टेम्पोची काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या