‘ती’ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, पुण्यातील सराफाकडे 50 कोटींच्या खंडणीची मागणी

3190

पुणे शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला महिलेसोबत असल्याची व्हिडीओ क्लिप दाखवून पिस्तूलाच्या धाकाने 50 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने दोघा अंगरक्षकासह तिघांना जेरबंद केले. आशिष हरिचंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, सहकारनगर), रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, रा. तुळशीबाग वाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 42 वर्षीय सराफ व्यावयासिकाने तक्रार दिली आहे.

आशिष पवार व चौधरी हे सराफ व्यावसायिकाकडे बॉडीगार्ड म्हणून काम करतात. रमेश पवार हा सराफ व्यावसियाकाच्या घरात काम करतो. या आरोपींनी नेमशी कशामुळे खंडणी मागितली याचा तपास केला जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चनिंसग यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिकाचे पूर्वीचे बॉडीगार्ड असलेले आरोपींनी घरकाम करणाऱ्या रमेश पवार याच्या मदतीने एक व्हिडीओ क्लिप तयार केली. त्यानंतर आरोपींनी ती व्हिडिओ क्लिप सराफ व्यवसायिकाला दाखविली. व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे चार मार्चला 50 कोटी रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यास गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तक्रारदाराने सोमवारी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनिंसग यांच्याकडे धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी तिघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या