पुणे : पतंग उडवण्यासाठी गच्चीची चावी मागितली, नकार दिल्याने सोसायटीच्या सचिवाला बदडले

3050
fight
file photo

गच्चीची चावी देण्यास नकार दिल्याने एका वकिलाला, त्याच्या बायकोला आणि आईला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील खडकी भागातील भिमाले संकुलातील ही घटना आहे. या वकिलाने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे सागर चव्हाण, ईश्वर गायकवाड, राजेश पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हे तिघेही जण तक्रारदार राहात असलेल्या इमारतीमध्येच राहतात.

आरोपींना 22 जुलैपर्यंत जामीन मंजूर

16 जुलै रोजी वकील सागर काळे यांनी आपल्यासोबत हा प्रकार घडल्याचे त्याच दिवशी पोलिसांना कळवले होते. त्याच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी प्रथम खबरी अहवाल म्हणजेच FIR नोंदवली होती.पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे. अखेर शनिवारी या तिघांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

सागर काळे हे सोसायटीचे सचिव आहेत. ते त्यांच्या कुटुंबासह 10 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या इमारतीच्या गच्चीची चावी ही त्यांच्याकडेच असते. लॉकडाऊन काळामध्ये सोसायटीमधील सर्व सदस्यांनी गच्चीचा वापर करणं टाळलं होतं. सागर चव्हाण, ईश्वर गायकवाड, राजेश पवार यांनी काळे यांच्याकडे एकेदिवशी चावीची मागणी केली. काळे यांनी चावी देण्यास नकार दिला. सोसायटीच्या अध्यक्षाची आणि इतर समिती सदस्यांची परवानगी मिळाल्याशिवाय आपण चावी देऊ शकत नाही असे त्यांनी या तीन तरुणांना सांगितले.

16 जुलै रोजी काळे राहात असलेल्या इमारतीमध्ये 12 व्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेचा आवाज काळे यांच्या बायकोला आणि आईला आला. त्या दोघी वर गेल्या तेव्हा हे तिघे तरूण 12 व्या मजल्यावरील महिलेशी भांडत असल्याचं दिसलं. आम्हाला पतंग उडवायला का जाऊ देत नाही असं विचारत हे तिघे जण भांडत होते. काळे यांच्या आईने आणि बायकोने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिघा तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सागर काळे यांनी मध्यस्ती केली असता त्यांनाही शिवीगाळ करत चपलेने मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे. या तिघांनी महिलांचा विनयभंग देखील केल्याचं काळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

काळे आणि इतर सदस्यांनी पोलिसांना 100 नंबरवर घडलेला प्रकार कळवला. पोलीस येईपपर्यंत आरोपी फरार झाले होते. त्यानंतर 2 दिवस पोलिसांनी काहीही केलं नाही असं काळे यांनी म्हटलं आहे. आपण सहाय्यक पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली मात्र त्या आधी आमच्यावर अदखल पात्र गुन्हा नोंदवला असं काळे यांनी पुणे मिररला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या