वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमथडीची जत्रा स्थगित

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतर्फे यंदाही भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. येत्या 24 ते 28 फेब्रुवारीला पुण्यातील शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यायात ही जत्रा पार पडणार होती. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही जत्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र सध्या वाढत्या कोरोना प्रादूर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुढील काही काळासाठी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत भीमथडीची जत्रा सध्या स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या