ऑनलाईन जुगार खेळणार्‍यांवर कारवाई, लोणी काळभोरमध्ये गुन्हे शाखेचा छापा

मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपवर ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळणार्‍या व खेळविणार्‍या आरोपींवर कारवाई करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रोख रक्कम व जूगाराचे साहित्य असा 79 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोरमधील वाकवस्ती भागात ही कारवाई करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा विभागाकडून शहर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे, जूगार, मटका अड्ड्यांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू आहे. यानूसार पथकाने मागील काही दिवसांत शहरातील विविध भागात कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक हद्दीत गस्तीवर असताना लोणी काळभोरमधील वाकवस्ती भागात काहीजण ऑनलाईन पद्धतीने जूगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून प्रत्यक्ष कारवाई करत सात जणांना ताब्यात घेत ७९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जूगार प्रतिंबधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुररक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.