पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीची काढली छेड, आरोपी ताब्यात

764

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीची छेड काढून पळून जाणाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून पकडले. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर ही घटना घडली. छेड काढणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सखाराम वर्पे (सध्या रा. बोपोडी, मुळ रा. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. विद्यापीठात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोस्ट ऑफिसजवळून वसतिगृहाकडे जात होती. त्यावेळी सायकलवरुन आलेल्या एकाने विद्यार्थिनीला अडवून छेड काढली. विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यानंतर तिचा आवाज ऐकूण जवळील सुरक्षारक्षकाने पोस्ट ऑफिसच्या दिशेने धाव घेतली. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. मात्र, काही वेळात सुरक्षा रक्षकांची अधिक कुमक दाखल झाली. यानंतर अवघ्या काही मिनीटात सुरक्षा रक्षकांनी विद्यापीठातील एलीस गार्डन येथून ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

संबंधित व्यक्तीला घटनेनंतर किरकोळ मारहाण झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती चतुःश्रुगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या