लग्नापूर्वीच्या मित्राशी पत्नी करायची चॅटींग, पतीने उचलले भयंकर पाऊल

1513

बायको फेसबुकवर लग्नापूर्वीच्या मित्रासोबत चॅटींग करते हे समजल्यानंतर एका तरुणाने बायकोच्या मित्राचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. सौरभ व्यंकट जाधव असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो औंध परिसरातील संजयनगर भागात राहायचा. याप्रकरणी अजय शेख व त्याचा मित्र सोन्या बराठे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अजय शेखची पत्नी ही सौऱभला लग्नाच्या आधीपासून ओळखायची. लग्नानंतर पुन्हा ते फेसबुकवरुन पुन्हा ते संपर्कात आले. त्यानंतर ते दररोज एकमेकाशी चॅटींग करायचे. मात्र अजयला त्यांचे बोलणे आवडायचे नाही. त्यामुळे त्याचे व त्याच्या पत्नीचे सतत त्यावरून वाद व्हायचे. मात्र पत्नी सौरभ सोबत बोलणं थांबवत नसल्याने त्याने सौरभची हत्या करण्याचा प्लान आखला. त्याने फेसबुकवरून सौरभशी संपर्क साधून त्याला औंध येथे एका रुग्णालयाजवळ बोलावले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप सुरा फिरवला व तेथून पळ काढला. या हल्ल्यात सौरभचा जागीच मृत्यू झाला. सौरभने अजयला भेटण्यापूर्वी त्याचा भाऊ सुशांत जाधव या सर्वाविषयी सांगितले होते. त्यामुळे सुशांतने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अजय व सोन्याच्या मुसक्या आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या