राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसलेसह चौघांना अटक

587

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल 71 कोटी 78 लाखांचे व्यवहार लपवून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने आज रात्री उशिरा अटक केले. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध 8 जानेवारीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 मे दरम्यान घडली आहे. याप्रकरणी योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल भोसले , शैलेश भोसले, तानाजी पडवळ, ए. सी. जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक आहेत. 2018-19 च्या बँक लेखा जोखा अहवालात भोसले यांच्यासह 11 जणांनी स्वतः च्या फायद्यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून खऱ्या असल्याचे भासवून 71 कोटी 78 लाख लपवून ठेवले. मात्र, बँकेच्या ऑडीटमध्ये संबंधित नोंदी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध 8 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेने चौघांना जेरबंद केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या