पुणे महापालिकेतील तोडफोडप्रकरणी भाजपच्या २५ कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल

23

सामना ऑनलाईन, पुणे

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन भाजप कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेत तोडफोड करून राडा घातला. याप्रकरणी भाजपचे शहर सरचिटणीस गणेश घोष यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यात पालिकेचे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी गणेश घोष यांचे नाव निश्चित केले होते परंतु अंतिम क्षणी घोष यांचा पत्ता कट करून गणेश बीडकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश बीडकर यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले.

आपली प्रतिक्रिया द्या