माजी नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरण; नगर एलसीबीच्या 16 कर्मचार्‍यांना हायकोर्टाच्या नोटिसा

610

दिवंगत माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल तपास व्हावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पिटीशन नं. 1195/2018 ची सुनावणी गुरुवारी दुपारी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवाळकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायालयाने संबंधित प्रकरणातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह 16 पोलिस कर्मचार्‍यांना आपले म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटिसा जारी केल्या आहेत.

तसेच संबंधित प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) आजपर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 मार्च 2020 रोजी होणार आहे. पुढील सुनावणी तारखेपर्यंत सीआयडीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे. रिट पिटीशनर निर्मला गिरवले यांच्यातर्फे अ‍ॅड. नितीन गवारे पाटील यांनी बाजू मांडली.

अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक गिरवलेंचा मृत्यू

आपली प्रतिक्रिया द्या