मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी, मुलगी ठार

भरधाव मोटारचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून सात वर्षीय चिमुरडी ठार झाली. हा अपघात 22 सप्टेंबरला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास खराडीतील शितळादेवी मंदीर चौकात घडला.

रिया उमेश पवार (वय  07 रा. खराडी ) असे ठार झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. उमेश पवार (वय 39 असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अमित कुमार संजय प्रधान (वय 41 रा.चंदननगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

उमेश हे मुलगी रियाला घेउन दुचाकीवर चालले होते. त्यावेळी शितळादेवी चौकात अमितकुमारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे उमेश आणि रिया गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान, रियाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी चंदननगर पोलिस तपास करीत आहेत.